लव्ह स्टोरी 2

आज एका हॉटेलमध्ये एक जोडपं आणि त्यांचा सात आठ वर्षांचा मुलगा जेवायला आले होते.

त्या मुलाने काहिही मागितले किंवा काहिही मत व्यक्त केले की त्याला उत्तर म्हणून त्याची मूर्ख आई, तू अभ्यास करीत नाहीस म्हणून तुला घ्यावसं वाटत नाही किंवा तू अभ्यास केलास तर तुला मी हवे ते देईन, अशी सुरुवात किंवा शेवट करीत होती.

परीणामी तो मुलगा अतिशय वेंधळा झालेला दिसत होता. त्याच्या हातून पाणी तरी सांडत होते किंवा त्याचे डोके तरी आपटत होते किंवा वाटी तरी उपडी होत होती.

त्या सगळ्या एपिसोडस् चा शेवट तू दोषी आहेस, असाच होत होता.

ती मूर्ख आणि नादान आई आपल्या मुलाचे किती नुकसान करते आहे हे त्या बावळट बापाच्या सुद्धा लक्षात येत नव्हते. ते येडं मुलाची बाजू घ्यायच्या ऐवजी लाचारपणे बायकोची बाजू घेऊन पोराची पुरती वाट लावत होता.

विशेष म्हणजे अशा केसेसमध्ये हे सगळे बोलते ते मी तुझ्या भल्यासाठी बोलते, असे ती आई आपल्या मुलाला बेमालूमपणे समजवण्यात आणि स्वतःकडे महात्म्य घेण्यात वाकबगार असते.

खरे तर आई वडिलांची गरज मुलांना फारशी नसतेच.

वयाच्या आठव्या वर्षी आद्य शंकराचार्य घरातून बाहेर पडले होते.

विवेकानंदांनी वयाच्या विसाव्या वर्षी घर सोडले होते.

ज्ञानेश्वरांना वयाच्या आठव्या वर्षी आई वडील सोडून गेले होते.

लोकमान्य टिळक आईवडिलांच्या बालपणीच झालेल्या मृत्यूनंतर काकांकडे आले होते.

भीमसेन जोशी असे लहानपणीच घर सोडून सवाई गंधर्वांच्या घरी गाणं शिकण्यासाठी गेले होते.

लताबाईंचे पितृछत्र लहानपणीच हरवले होते.

हरिप्रसाद चौरसिया संगीत शिकण्यासाठी असेच तरुण वयात घर सोडून मुंबईला आले होते.

भगवान बुद्ध अगदी तरुण वयात म्हणजे विवाह झाल्या नंतर लगेचच घर सोडून बाहेर पडले होते.

रामदास स्वामींनी लग्नातच पलायन केले होते.

कठोपनिषदात लहान नचिकेताच्या वडिलांनी भरपूर गोधन दानात दिलं होतं, तुम्ही मला कुणासाठी ठेवलं आहे? असे नचिकेत सातत्याने विचारत होता, वडिलांनी संतापून सांगितले तुला यमासाठी ठेवले आहे.

नचिकेत खरोखरच घराबाहेर पडून मृत्यूचे गूढ शोधण्याच्या कामाला लागला.

एका विशिष्ठ वयानंतर, म्हणजेच टीन एजच्या सुरुवाती पासूनच, आई वडिलांवाचून मुलांचे खरेतर काहिही अडत नसते. आई वडिलांनी त्यांच्यात फार लुडबुड केली नाही तर मुलांना आपला सूर फार लवकर गवसतो.

आई वडीलांच्या कौतुकाने पोरं निष्क्रीय होतात, तर काही पोरं आई वडिलांच्या अति कठोरपणा मुळे निष्क्रीय होतात.

लव्ह स्टोरी 1

आपल्या वयाच्या दहा वर्ष मोठ्या माणसाच्या प्रेमात मी पडले कशी,,,,,,,,

Click Here