काही काही सरकारी अधिकारी लाच घेतात हे काय लपून राहिलेलं नाहीय. पेन्शनसाठी संप करणाऱ्या विरोधात गळा काढून काढून दमलेल्या माझ्या समाजसुधारकं मित्रांसाठी सांगतोय.
समाज लय बारा बोड्याचा हाय. समाजाची नैतिकता ढासळलीय. शेतात खुपणाऱ्या बाया पण मालक माघं नसेल तर एकाच जागी खुरप्यानं टोकरतं बसतात. गडी तर खुशाल झाडाखाली झोपा काडतात.
येवढचं काय काही ऊसतोड करणारे वाड्याला चांगले पैसे भेटावं म्हणून उसाच्या दोन चार कांड्या वाड्यालाच ठेवतात.
काही गाडीवरचे ड्रायव्हर डिझेल चोरतात. तर काही सिमेंटच्या गाडीवाले तर सिंमेट चोरतात. काही जीसीबीचे ड्रायव्हर गप्पचिप दोन चार तास काम करून पैसे हाणून मोकळे हुतात.
इतकचं काय बरेच जण तर दुधात पाणी घालू घालू दूध वाढतात. माणसं दिसलं तिथं हातसाफ करायला बघतात.
त्यामुळे स्व:तासाठी जगा. स्वःता इतकं मजबूत व्हायचं की काम अडवायची हिंमत नाही झाली पाहिजे कोणत्याच अधिकाऱ्यांची बाकी मार्च एन्ड हाय मनून सांगतो
#सबसे_कातिल_गौतमी_पाटील 😅
#सिधीबात